तंत्रज्ञान आणि महिला

तंत्रज्ञानाने जगामधे खूप प्रगती केली पण अजूनही तंत्रज्ञानाचा महिला वर्ग वापर करतांना खूप घाबरतांना दिसतात. उच्च पदस्थ स्त्रियांमधे सुद्धा याबाबत आत्मविश्वास नसलेला दिसतो मग ब-याच स्त्रियांशी चर्चा केल्यावर हा सूर ऐकायला …नको बाई काही कमी जास्त झाल तर किंवा आर्थिक बाबतीत झटका बसला तर…. पण ही भिती बाळगणे योग्य नाही……काळानुरूप तंत्रज्ञान महिलांनी अवगत करणे अगत्याचे आहे……

खर तर पुरूष वर्ग तंत्रज्ञानाच्या बाबतीत परिपूर्ण आहे अस म्हणता येणार नाही पण पुरूष वर्ग तंत्रज्ञानाचा वापर करतांना चुका आणि शिका हे तत्व पाळतांना दिसतात अथवा कधीकाळी झालेल नुकसान, झालेली चुक फारशी मनावर घेत नाहीत. पण स्त्रियांच्या बाबतीत अस घडत नाही…

आजही स्त्रियांकरता मोबाईल चा वापर करतांना बंधन येतात ती नजर ठेऊन…. कमावत्या स्त्रिया असल्या तरी अजूनही स्त्रियांना स्वतःच्या पगाराचे विवरण सांगता येत नाही कारण याबद्दल जाणून काय करायच अशी भूमिका स्त्रियांचिच असते… पण हे कुठेतरी बदलायला हव स्त्रियांनी काळानुरूप  स्वतःसाठी जागरूक राहायलाच हव……नवरा व्यवहार बघतो मग मला काय करायच ही भूमिका नसावी कारण जरी घरात पुरूष व्यवहार करत असले तरी त्या व्यवहार करण्याचे तंत्रज्ञान मात्र स्त्रियांनी शिकूण घेणे गरजेचे आहे….

 उदा. इलेक्ट्रिक बील, पाणी बील भरतांना अर्थात गुगल पे, फोन पे अथवा इतर गोष्टींचे तंत्र महिला वर्गाने जाणून घेणे काळाची गरज झालेली आहे….. कधी कधी ऑनलाईन शॉपींग ब-याच महिला करतात पण कॅश ऑन डिलीवरी हा पर्याय जास्त निवडला जातो रिटर्न प्रोसेस त्यांना माहीत नसते … अगदी पहिल्यांदा हा अनुभव घेतांना छोट्या छोट्या गोष्टीपासून सुरवात केली तर आत्मविश्वास वाढेल व नंतर हळूहळू व्यवहार जमायला लागतो… पण मला जमत नाही काहीबाही झाले तर ही भिती कायम मनात ठेवली तर तुम्ही तंत्रज्ञानापासून दूर राहाल…..तेंव्हा स्वतःला सिद्ध करा काही बिघडणार नाही….

कधी कधी घरातून किंवा समाजातून बाई जास्त शिकली, स्वतःला जास्त हुशार समजते, तुला काय कळत, अति शहाणी झालीस का? असे शब्द नुकसान झाल्यास अथवा विपरीत घडल्यास ऐकायला मिळतात पण पुरूष सुद्धा एखाद वेळेस चुकून बोट दुसरीकडे टच झाल किंवा अंक चुकले तर आर्थिक नुकसान अथवा इतर कारणांना कारणीभूत होतातच पण पुरूषांच्या बाबतीत फारस कुणी बोलतांना दिसत नाही……

    उलट मी अस म्हणेन घराघरातून पुरूष, मुल, मुली तंत्रज्ञानाबाबत अवगत असतील तर घरातली स्त्री ह्या गोष्टी कशी शिकेल याबाबत सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येकाकडे असावा.  कारण बदलत असलेल जग, नवनवीन तंत्रज्ञान, वेळ, आर्थिक उलाढाल, याबाबत समाजात परिवर्तन होतांना दिसतय …..त्यानुसार व स्त्रियांच्या आयुष्यात तिला जगतांना , एकट्याने सामोरी जातांना येणा-या अडचणी सोडवायच्या असतील तर तंत्रज्ञानाची कास धरायलाच हवी….ज्याप्रमाणे पुरूष ,घरातली तरूण पीढी आपले व्यवहार ,आनंद, ज्ञान, आचार विचार याबाबत स्वतंत्र  तंत्रज्ञानाचा वापर करतात मोबाईल, कम्प्युटर, लॅपटॉप, या वस्तू हाताळतात वेगवेगळे फीचर्स, ॲप जाणून घेतात त्याप्रमाणेच स्त्रियांनी सुद्धा काळानुरूप स्वतःला याबाबत अलर्ट व अपडेट ठेवायला हवे स्वतःचा आनंद, स्वतःचे व्यवहार, स्वतःचे ज्ञान वृद्धींगत करायलाच हवे….

   शहाणी, बावळट, अडाणी, अतिशहाणी, आगाऊ, फॉर्वर्ड म्हंटले तरी चालेल पण सख्यांनो तुम्ही मूर्ख नसून एक आत्मविश्वासू स्त्री आहात हे सिद्ध करा तंत्रज्ञान जाणून घ्या स्वतःच अस्तित्व स्वतःचे व्यवहार न घाबरता करून बघा चुकाल पण नक्की शिकाल … मैत्रिणींनो तुमच्या किटी पार्टी, बीसी पार्टी, गेट टूगेदरच्या वेळी  हेही जरा जाणून घ्या….तुम्ही बावळट नसून सक्षम आहात…….

        चला तर आत्मविश्वासाची कास धरा तंत्रज्ञानाचा ध्यास खरा…

मंजू वणवे, अमरावती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on