नवीन शैक्षणिक धोरण व शिक्षक प्रशिक्षण

राष्ट्र उभारणीसाठी, राष्ट्राच्या विकासासाठी तसेच मानवी जीवनमान उंचावण्यासाठी शिक्षणाचे महत्व जीवनात काय आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. RTE Act 2009 ने सर्वांना मोफत सक्तीचे आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. शिक्षण ही बदलाची नांदी आहे हे सत्य स्वीकारून त्याशिक्षण प्रक्रियेतील बदलही स्वीकारले पाहिजे. त्या बदलांचे एक विशिष्ट पद्धतीने अवलोकन करणे गरजेचे ठरते.

            सर्वांसाठी सर्व समावेशक आणि समान गुणवत्तेचे शिक्षण सुनिश्चित करून सर्वांसाठी निरंतर अध्ययनाच्या शिक्षणाच्या संधींना प्रोत्साहन देणे हे एकमेव उद्दिष्ट ठेवून NEP 2020 तयार करण्यात आलेला आहे आणि हेच उद्दिष्ट साध्य करण्याकरिता, अध्ययनाला पाठिंबा देण्यासाठी, नवीन शैक्षणिक धोरण आखण्यात आले आहे.    

        शिक्षण प्रणालीच्या केंद्रस्थानी असलेला शिक्षक आणि शिक्षण यातील अडथळा ठरलेल्या समस्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न या धोरणात केलेला दिसून येतो. मग त्यात शिक्षक शिक्षण असो, शिक्षकाचे सुधारित सेवा परिस्थिती असो वा व्यावसायिक विकास यासारख्या बाबींचा निश्चित आणि साचेबद्धपणा आणण्यासाठी काही शिफारसी  केलेल्या दिसून येतात. त्याचा एकमेव उद्देश्य हा शिक्षक प्रशिक्षणाची गुणवत्ता वृद्धिंगत करणे आहे. नवीन गुणवत्तापूर्ण पिढी घडवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षक तयार करणे पर्यायाने त्या स्वरूपाचे शिक्षण दिले जाणे गरजेचे आहे. मूल्य, ज्ञान, प्रवृत्ती, बहुशाखीय दृष्टिकोन, भारतीय परंपरा या बाबींची रुजवणूक गरजेची आहे. या प्रणालीचा हेतू तार्किक विचार, नियोजनबद्ध कृती करण्यास सक्षम असलेला, वैज्ञानिक दृष्टी असलेला, रचनात्मक कल्पनाशक्ती नैतिक बांधिलकी मूल्य असलेली व्यक्ती तयार करणे आहे. आपल्या घटनेने दिलेला न् न्याय्य समाज निर्मितीसाठी चांगल्या प्रकारे योगदान देणारे नागरिक घडवणे हा आहे. शिक्षणाच्या माध्यमातून किंवा आकलन क्षमताच विकसित केल्या जात नाहीत तर साक्षरता आणि संख्याज्ञान या मूलभूत क्षमता व उच्च दर्जाच्या तार्किक आणि समस्या निराकरण क्षमता सोबतच सामाजिक नैतिक आणि भावनिक क्षमतांचा सुद्धा विकास केला गेला पाहिजे. या अनुषंगाने NEP2020 मध्ये शिक्षण प्रशिक्षणात काही बदल अंतर्भूत केलेले आहेत. ज्यामध्ये शिक्षकाची किमान व्यावसायिक अहर्ता B.ed हा एकात्मिक कार्यक्रम चार वर्षाचा करण्यात आलेला आहे.या सोबतच बहुविद्याशाखीय दृष्टिकोन हा सर्वांगीण शिक्षण प्रणालीला प्रोत्साहन देणारा असून ज्यामुळे भावी शिक्षकांना सर्वच प्रकारच्या विषयांची सविस्तर आणि सखोल माहिती प्राप्त होऊ शकते. शिक्षकांच्या संपूर्ण सेवा काळातील सतत व्यावसायिक (Continuous Professional Development) विकासावर भर देणारे हे शैक्षणिक धोरण आहे. या धोरणानुसार नवनवीन शैक्षणिक पद्धती, शैक्षणिक घडामोडी, तंत्रज्ञान यासंबंधी अद्यावत राहण्यासाठी शिक्षकांना निरंतर प्रशिक्षणाची, मार्गदर्शनाची आवश्यकता आहे. NEP2020 नुसार शिक्षकांना संपूर्ण सेवा काळात 50 तासांचे प्रशिक्षण बंधनकारक करण्यात आले आहे. भारतातील शिक्षक शिक्षणाच्या NCTE (National Counsil for Teacher Education) या नियामक संस्थेला पुनर्रचित बळकट करण्याबरोबरच शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांची नियमन व मान्यता सुनिश्चित करण्याची शिफारस देखील NEP2020 मध्ये केलेली आहे.

कोरोना काळापासून अध्ययन अध्यापनात कोरोना वापर पाहता शिक्षक शिक्षण आणि व्यावसायिक विकासासाठी डिजिटल संसाधने आणि  Diksha, Coursera यासारखे ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करण्यासाठी प्रेरित करते. शिक्षणातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांपैकी भाषा हा एक आहे यांनी NEP2020 च्या द्विभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन देते विद्यार्थ्यांची मातृभाषेतून शिकण्याची क्षमता विकसनाबरोबर इंग्रजीतही प्रवीण असणे गरजेचे आहे हे सांगते.  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या उद्दिष्टांमध्ये सर्वसमावेशक हा महत्त्वपूर्ण शब्द शिक्षक शिक्षणात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अंतर्भाव अधोरेखित करतो. समानता व समावेशक प्रशिक्षण न्याय्य शैक्षणिक वातावरण निर्मिती व विविध गरजा पूर्ण करण्यावर भर दिलेला आहे. वास्तविक जगाशी अनुकूलन व्हावे या उद्देशाने व्यावहारिक अनुभव वर्गात समाविष्ट करणे क्रमप्राप्त असते म्हणून हा अनुभव त्यांना शालेय जीवनापासून मिळावा या उद्देशाने इंटरनेटचा समावेश केलेला आहे शिक्षण क्षेत्रातील अध्यापन संशोधन अनुभवाला महत्त्व प्राप्त होऊन बहुवाशीय बहुशाकीय शिक्षण व संकल्पनात्मक विकासाला प्रोत्साहन मिळेल शिक्षक प्रशिक्षणातील हे बदल केवळ शिक्षक प्रशिक्षणाचे गुणवत्ता परिणामकारकता वाढवण्याच्या उद्देशाने असून या बदलांचा स्वीकार राज्य आणि संस्थांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतील.

श्रीमती मनीषा भगवान सावळे

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा महालक्ष्मी नगर (विराणे)

तालुका मालेगाव जिल्हा नाशिक 7798744380

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Content Protection is on